महापालिकाच्या पायऱ्यावर सोमय्या यांच्या सत्कारानंतर कॉंग्रेसनं गोमूत्र , गुलाबपाणी टाकून महापालिकेचं केलं शुद्धीकरण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आले होते. त्यावेळी महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यावेळी शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन किरीट सोमय्यांचा महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला. दरम्यान, या सत्कारानंतर काँग्रेसने या पायऱ्यांचं गोमूत्र आणि गुलाबपाणी टाकून शुद्धीकरण केलं.
महापालिका भवनाला पाेलिस छावणीचे स्वरुप
शहर भाजपने माजी खासदार किरीट साेमय्या यांचा सत्कार केला, त्याचा फटका मात्र महापालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसला. गेल्या आठवड्यात शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी साेमय्या पुन्हा हे महापालिकेत आले. काेणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका भवनाला पाेलिस छावणीचे स्वरुप आले हाेते. विविध कामासाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारला. भरउन्हात ताटकळत थांबण्याची वेळ नागरिकांवर आली हाेती.
.म्हणून घेतली आयुक्तांची भेट
पीएमआरडीएने उभारलेले जम्बो रुग्णालय चालविण्यासाठी देण्यात आले हाेते. त्यामध्ये माेठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावा करीत साेमय्या हे गेल्या शनिवारी महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांना भेटण्यासाठी आले हाेते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना राेखले हाेते. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत साेमय्या यांना मार लागला हाेता. या पार्श्वभूमीवर साेमय्या हे शुक्रवारी पुन्हा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आले हाेते.
पाेलिस बंदाेबस्त की छावणी?
काेणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेच्या इमारतीचा ताबा हा पोलिसांनी सकाळपासूनच घेतला हाेता. शिवसैनिकांकडून काेणतेही कृत्य केले जाऊ शकते, तसेच काॅंग्रेसनेही साेमय्या यांच्या सत्काराला विराेध दर्शवित आंदाेलन करण्याचा इशारा दिला हाेता. या पार्श्वभूमीवर महापालिका भवनाला पाेलिस छावणीचे स्वरुप आले हाेते. महापालिका भवनाशेजारी रस्ते वाहतुकीला बंद केले हाेते. महापालिकेत केवळ नगरसेवक, कर्मचारी आणि पत्रकारांनाच प्रवेश दिला गेला.

काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष सोशल मीडिया पदी सादात पठाण यांची निवड….
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….