हिजाब प्रकरण ; घुंगट व जीन्स महिलांना स्वतःच्या इच्छेनुसार घालण्याचा अधिकार संविधानाने दिला :- प्रियंका गांधींची प्रतिक्रिया….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बंगळुरू: कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचे पडसाद देशभर उमटत असल्याचे दिसत आहे. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचे आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे.

प्रियंका गांधींनी ट्विटरवर लिहिले की, ‘बिकिनी असो, जीन्स असो, हिजाब असो किंवा डोक्यावर पदर घेणे असो, महिलांना त्यांच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्यावरील अत्याचार थांबवा.’ ट्विटच्या शेवटी प्रियांकांनी ‘लडकी हूं, लड सकती हूं’ या मोहिमेचा हॅशटॅगही टाकला आहे.
धार्मिक पेहरावावर बंदी घालण्याच्या आदेशानंतर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे गट आमनेसामने आले आहेत. दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. मुस्लिम विद्यार्थी हिजाब बंदी विरोधात आंदोलन करत आहेत, तर अनेक हिंदू विद्यार्थी भगवे गमछे परिधान करुन कॅम्पसमध्ये घोषणा देत आहेत. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 3 दिवसांसाठी बंद ठेवली आहेत.
या प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर आजही सुनावणी होणार आहे. मात्र विद्यार्थिनींच्या वकिलाला भाजपने आक्षेप घेतला आहे. विद्यार्थिनींचे वकील हे काँग्रेसचे नेते असल्याचे भाजपचे म्हणणे आहे आणि यावरुन हा वाद भडकावण्यात काँग्रेसचा हात असल्याचे सिद्ध होते, असा आरोप करण्यात येत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..