स्पष्ट आरोपाशिवाय सासरच्या विरोधात खटला दाखल करणे म्हणजे कायद्याचा दुरुपयोग ; हुंडा प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- हुंड्यासाठी होणाऱ्या छळाच्या प्रकरणांत स्पष्ट आरोपांशिवाय पतीच्या नातेवाईकांवर खटला चालवणे हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
अशा प्रकरणांत किरकोळ व बहुउद्देशीय आरोपांवरून पतीच्या नातेवाईकांवर खटला चालवता येणार नाही, असे बजावत न्यायालयाने महिलेच्या सासरच्यांविरुद्ध चालवला गेलेला हुंडय़ाचा खटला फेटाळून लावला.
न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. आजकाल हुंड्यासाठी होणाऱ्या छळासंबंधित 498(ए) हे भादंवि कलम पतीच्या नातेवाईकांना आपली धमक दाखवून देण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात आहे. अशा फौजदारी खटल्यात निर्दोष सुटण्याची शक्यता असते. मात्र हुंडय़ासाठीच्या छळाचा गंभीर डाग पुसला जात नाही. त्यामुळे सर्वसाधारण आणि बहुउद्देशीय आरोप करण्याचे प्रकार थांबवावेत असे मत खंडपीठाने नोंदवले. बिहारमधील हुंडय़ाच्या प्रकरणात सासरच्यांवर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची विनंती करीत पती व त्याच्या नातेवाईकांनी न्यायालयात दाद मागितली होती.

‘तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं’, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंवर शाईफेक….
गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक….
सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा कोण घेणार..? जय पवारांसह ६ नेत्यांची नावं चर्चेत, कोण होणार खासदार..?
विजय तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार की नाही हे ठरवणाऱ्या खऱ्या ‘किंगमेकर’चं महाराष्ट्र कनेक्शन….
भरती प्रक्रियेत भूमिपुत्रांसाठी आरक्षण, फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक, कुणाला होणार फायदा..?
तुम्हालाही हक्काची मिळणार जमीन ; भूदान चळवळीतील जमिनीबाबत राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय…..