आज पासून मिळणार बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल 2022 च्या बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट 9 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये शाळा व महाविद्यालयाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडून हॉल तिकीट विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
मार्च-एप्रिल 2022 च्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळाकडून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारीला उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना हॉल तिकिटे उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे. हॉल तिकिटासंदर्भात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्यांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेले हॉल तिकीट प्रिंटिंग करून देताना विद्यार्थ्यांना कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
हॉल तिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, तसेच हॉल तिकीटमध्ये विषय व माध्यम बदल असल्यास त्याची दुरुस्ती शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करावयची आहे, अशा सूचना मंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास त्याला दुय्यम प्रत देऊन त्यावर लाल शाईने शेरा मारावा, फोटो सदोष असल्यास हॉल तिकीटवर नवीन फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची असल्याच्या सूचना राज्य मंडळाकडून मुख्याध्यापक व प्राचार्यांना केल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..