गेल्या 24 तासात 167 पॉझिटिव्ह ; 203 कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1716 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 1702
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 02 फेब्रुवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 167 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 203 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 1660 व बाहेर जिल्ह्यात 42 अशी एकूण 1702 झाली असून त्यातील 41 रूग्ण रूग्णालयात तर 1661 गृहविलगीकरणात आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1156 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 989 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 77880 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 74385 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1793 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 167 रूग्णांमध्ये 72 महिला व 95 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यातील 30, बाभुळगाव सहा, दारव्हा सहा, दिग्रस 19, घाटंजी 11, महागाव एक, नेर एक, पांढरकवडा 11, पुसद नऊ, राळेगाव एक, वणी सहा, यवतमाळ 55, झरी जामणी एक व इतर जिल्ह्यातील 10 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाख 20 हजार 670 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 42 हजार 480 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.49 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 14.45 आहे तर मृत्यूदर 2.30 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1716 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1766 आहे. यापैकी 50 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1716 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 48 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 739 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 857 बेडपैकी 2 बेड उपयोगात असून 855 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 122 बेडपैकी पुर्ण 122 बेड शिल्लक आहेत.
कोरोना रुग्णसंख्येत सगळीकडे वाढ होत असून नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या कोरोना त्रीसुत्री नियमांचे पालन करावे, तसेच कोरोनाचे लसीकरण पुर्ण करून स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..