शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण ; या कारणामुळे खटला दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अभिनेता सलमान अनेक वेळा सण तसेच कार्यक्रम साजरे करण्यासाठी त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्ये कुटुंबासोबत जात सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी जात असतो. या फार्महाऊसमधील फोटो सलमान सोशल मीडियावर शेअर करत असतो.
लॉकडाऊनमध्ये देखील सलमान त्याच्या या पनवेल येथील घरामध्ये राहात होता. पनवेलमधल्या सलमानच्या फार्म हाऊसजवळच्या भूखंडाचा मालक असलेल्या केतन कक्कर विरूद्ध सलमाननं सिटी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला आहे.
सलमान खाननं त्याच्या शेजाऱ्याविरोधात म्हणजेच केतन कक्कड विरोधात मानहानीचा दावा दाखल केलाय. सोशल मीडियावर सलमान खानचे फोटो पोस्ट केल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला. यावर बंदी घातली पाहिजे, असं या तक्रारीमध्ये म्हटलंय.
केतन कक्कड यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टाला रिप्लाय फाईल करण्यातसाठी वेळ मागितला आहे. केतन कक्कर यांनी यूट्यूब चॅनेलवरून सलमानबाबत अपमानास्पद शब्दांचा वापर केला.
हा दावा दाखल झाल्यानंतर न्यायालयानं कक्कर यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.
दरम्यान, सलमान खाननं काही दिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस त्याच्या या पनवेल येथील घरात साजरा केला. त्यावेळी त्याला सापाने दंश केला होता.
सलमान खानला चावलेला हा साप बिनविषारी होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान खानवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात आलेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….