छत्रपती संभाजी राजे यांनी केली माहूर गड येथील रामगड किल्ल्याची पाहणी ; वनकर्मचारी समवेत राजेनी घेतला वनभोजनाचा स्वाद….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहुर :- राज्य सभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले हे आज दुपारी १२ वाजता माहुर गडावरील आई रेणुका मातेचे दर्शन घेतले नंतर संस्थानच्या वतीने विश्वस्त मंडळाकडून त्यांचे सत्कार करण्यात आले. संभाजी राजे यांनी माहूर येथील पौराणिक वास्तू असलेल्या रामगड किल्याची पदयात्रा करत पाहणी केली. रामगड किल्ल्याचे पुनर्विकासाचे काम पूर्ण होत आले असुन त्याच पद्धतीने माहूरगड येथील किल्ल्याचेही जतन होणे गरजेचे आहे, म्हणूण आम्हीं फोर्ट फ्रिडेसनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकुण ५० किल्ले दतक घेणार असुन त्या मध्ये माहुरगडाच्या किल्याचाही पुनर्विकास करण्याची इच्छा संभाजी राजे यांनी व्यक्त केली.
सोबतच स्थानीक श्रमदानातून किल्ले सवर्धन आणि साफसफाई करणाऱ्या युवकांना बळ देऊन त्याच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्याच्या टोकावर असलेल्या माहुरगड येथिल रामगड किल्ल्याच्या विकासाला बळकटी देण्याचे काम करू आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण,पुरातत्व विभाग अथवा वनविभागाच्या माध्यमातून किल्यावर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा कशा उपलब्ध होतील या कडे लक्ष घालणार असल्याचे सांगितले,गडावर येणाऱ्या भाविक अथवा पर्यटकांकडून किल्याच्या भिंतींवर विद्रुपीकरण करत नाव कोरून असल्याचे चित्र प्रत्यक्षदर्शी पाहिल्याने त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत किल्याचे पावित्र्य राखण्यासाठी सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असल्याचेही ते बोलले आणि किल्ल्याच्या केमिकल युक्त कामावर नाराजी व्यक्त करीत हे काम चुना,बेल ,गुळ ,उडीद दाळ अशा शाश्वत पद्धतीने करायला हवे होते म्हणून पुरातत्व विभाग याकडे लक्ष द्यावं त्या करीता पुरातत्व विभागाची मी लवकरच भेटणार असल्याचे सांगितले व शेवटी वनकर्मचारी, पोलिस अधिकारी,समवेत वनभोजनाचा स्वाद घेतला.यावेळी भवाणीदास भोपी,भागवत देवसरकर व टिम,अविनाश टनमने,विशाल शिंदे पाटील,त्रिशूल पाटील,बालाजी टनमने,अमोल कदम हडसनीकर,मंगेश जाधव,रफिक गाईड, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव,वनपाल अली, पोलिस निरिक्षक नामदेव रिठ्ठे साहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार,यांची उपस्थिती होती.