गेल्या 24 तासात 75 पॉझिटिव्ह ; 10 कोरोनामुक्त ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1730 बेड उपलब्ध ; ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह 248
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 10 जानेवारी :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात 75 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या जिल्ह्यात 229 व बाहेर जिल्ह्यात 19 अशी एकूण 248 झाली आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 992 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 75 अहवाल पॉझिटिव्ह असल्याने उर्वरित 917 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 73250 आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 71214 आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1788 मृत्यूची नोंद आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 75 रूग्णांमध्ये 31 महिला व 44 पुरूष असून त्यात आर्णी तालुक्यात चार, दारव्हा सहा, दिग्रस एक, नेर एक, पांढरकवडा चार, पुसद नऊ, वणी पाच, यवतमाळ येथील 38, झरी जामणी तीन व इतर जिल्ह्यातील चार रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सात लक्ष 94 हजार 316 चाचण्या झाल्या असून त्यापैकी सात लक्ष 20 हजार 955 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 9.22 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 7.56 आहे तर मृत्यूदर 2.44 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1730 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 7 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 1769 आहे. यापैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1730 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 787 बेडपैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 748 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 755 बेडपैकी पुर्ण 755 बेड शिल्लक आणि 7 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 227 बेडपैकी पुर्ण 227 बेड शिल्लक आहेत.

सरकारमध्ये दोनच खाती महत्त्वाची’, बावनकुळेंची राष्ट्रवादी शिवसेनेवर कुरघोडी, नेमका इशारा काय….?
‘तुम तो ठहरे परदेसी साथ क्या..’ या सुपरहिट गाण्याचे गीतकार जहीर आलम काळाच्या पडद्याआड…..
थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर…
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच विजय यांचे तीन धडाकेबाज निर्णय, कोणत्या फाइलवर केली पहिली सही..?
‘राज ठाकरे तुझे विचार माझ्या पायाच्या बुटाच्या धुळीबरोबर आहेत…’, सदावर्ते हे काय बोलून गेले..?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणांची उडाली झोप..! पुलाखाली सापडली स्फोटके ; मोठा अनर्थ टळला….