मुंबई विमानतळावर मोठा अपघात ; विमानाला ओढणाऱ्या वाहनाला लागली आग…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक धक्कदायक घटना समोर आली आहे.
रनवेवर विमान ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाडीला(पुशबॅख व्हिकल)ला आग लागली होती. ही आग लागली तेव्हा विमानात प्रवासी होते. पण, सुदैवाने यात कुठलीही जीनितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना टळली. विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाने अचानक पेट घेतला. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. ही आग लागली तेव्हा पुशबॅक वाहन गुजरातच्या जामनगरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट AI-647 ला ढकलत होते. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, अपघातावेळी विमानात सुमारे 85 प्रवासी होते. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये अग्निशमन दलाचे पथक आग विझवताना दिसत आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आणण्यात आली असून, या घटनेत विमानाचे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
मुंबई विमानतळाच्या पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-जामनगर फ्लाइटमध्ये 85 प्रवासी होते. अचानक पुशबॅक टगला आग लागली. या घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरुवात केली. 10 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही. आग आटोक्यात आणल्यानंतर सर्व कामे सुरळीत सुरू झाली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..