राज्यात रुग्णांची संख्या वाढतीच ; दिवसभरात ३६ हजाराहून अधिक रुग्ण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता चिंतेचं वातावरण वाढलं आहे. सध्या या पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
आज राज्यात तब्बल ३६,२६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.०८% एवढा आहे. राज्यात काल गुरुवारी २६,५३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्याची नोंद झाली होती. आज त्यात प्रचंड मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९९,४७,४३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,९३,२९७ (९.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,८५,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ८,९०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६५,३३,१५४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१७% एवढे झाले आहे
ओमायक्रॉनची काय आहे सध्यस्थिती?
आज राज्यात ७९ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –
मुंबई – ५७
ठाणे मनपा-७
नागपूर -६
पुणे मनपा – ५
पुणे ग्रामीण- ३
पिंपरी चिंचवड -१
आजपर्यंत राज्यात एकूण ८७६ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.