शरद पवारांची कोरोना आढावा बैठक संपली ; रेल्वे , कड़क निर्बंधांसह लॉकडाउन वर ही विशेष चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांची माहिती शरद पवार यांनी घेतली आहे.
कडक निर्बंध आणि लॉकडाऊनबाबतच्या गोष्टींवरही शरद पवारंनी चर्चा केली आहे. मुंबईतील ट्रेन बंद कऱण्याबाबत तुर्तास निर्णय झाला नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीची माहिती घेतली असून ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना परिस्थितीची आढावा घेतला. शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपल्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी राजेश टोपे म्हणाले की, या बैठकीमध्ये पवारांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. निर्बंधाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आढावा बैठक घेतली होती. यावर आजही चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री याबाबत चर्चा करतील आणि निर्बंधांबाबत निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यावर निर्बंधांवर अंमलबजावणी करण्यात येईल.
तसेच बैठकीत प्रामुख्याने जी चर्चा झाली आणि त्यावर एकमत झाले ते म्हणजे लसीकरण आहे. लसीकरण वाढवले पाहिजे असे शरद पवार यांचेही मत आहे. साधारण ८० लाख लोकांनी अजूनही लस घेतली नाही. तसेच ज्यांनी पहिली लस घेतल्यानंतर दुसरी लस घेतली नाही त्यांनीसुद्धा लस घेतली पाहिजे. यासाठी काय योजना आहेत ते सुद्धा समजून घेण्याचे काम केले आहे. लसीकऱण, लॉकडाऊन आणि निर्बंधांबाबत चर्चा झाली आहे. लग्न सोहळ्यांबाबतच्या गोष्टींवर कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांची संख्या कशी आटोक्यात येईल आणि कशी पुढची परिस्थिती राहिल याबाबतची माहिती दिली आहे. वीकेंड लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूबाबत चर्चा झाली आहे. पण निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री चर्चा करतील आणि निर्णय घेतील. मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय घेतील असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….