आ.नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कणकवलीतील शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले आ. नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांंनी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवार 7 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मंगळवार 4 जानेवारी रोजी या दोघांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. अॅड. शुभदा खोत यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तर विशेष सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी त्यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला होता.
राणे हेच हल्ल्यामागचे सूत्रधार असल्याचा दावा करताना त्यावर भुमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दोन दिवसांचा कालावधी द्यावा अशी विनंती न्यायालयाला केली होती. तर राणे यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड. नितीन प्रधान यांनी तोपर्यंत अटकेपासून दिलासा द्यावा अशी विनंती केली होती.
यावेळी अॅड. पासबोला यांनी तूर्तास तरी कठोर कारवाई करणार नाही अशी हमी न्यायालयात दिली होती. याची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास वेळ देताना अर्जाची सुनावणी शुक्रवार 7 जानेवारी रोजी दुपारी 2.30 वाजता निश्चित केली होती.त्यानुसार ही सुनावणी शुक्रवारी होऊन आ. नितेश राणे व गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्जाचा फैसला होणार आहे

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….