अखेर म्हाडाच्या भरती परिक्षेचे वेळापत्रक जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- गैरप्रकारामुळे रद्द झालेल्या म्हाडाच्या भरती परिक्षेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. २९ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून ही भरती परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. २९, ३०,३१ जानेवारी आणि १,२,३ फेब्रुवारी रोजी या परीक्षा होणार आहेत.
म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२ ते २० डिसेंबरदरम्यान राज्यभर भरती परीक्षा होणार होती. त्यासाठी पावणे तीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले.
परीक्षा घेण्याचे कंत्राट असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केले.
या गैरप्रकारानंतर म्हाडाने स्वत: परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली असून शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….