राज्यातील 1.05 कोटी शेतकऱ्यांना तब्बल 3828 कोटींचा लाभ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत देशातील 1.05 शेतकऱ्यांच्या खात्यात आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 3828 कोटी रूपये जमा होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये प्रंतप्रधानांनी म्हटले आहे की, नवीन वर्षाचा पहिला दिवस देशातील अन्नदात्यांना समर्पीत असेल. दुपारी व्हिडिओ कॉन्फरंसच्या माध्यमातून पीएम-किसान योजनेचा दहावा हप्ता जमा करण्याचे भाग्य लाभेल.
पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. 28 डिसेंबर 2021 अखेर 15987.98 कोटींची रक्कम महाराष्ट्रातील 108.70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. 1 डिसेंबर 2022 ते 31 मार्च 2022 या तीन महिन्यांतील दोन हजार रूपयांचा हप्ता आज दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते जमा होईल.
असे चेक करा तुमच्या खात्याचा स्टेटस
PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in भेट द्या. त्यानंतर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन येईल. Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये आपले नाव पाहू शकता.
कोणाला मिळणार पैसे?
या अंतर्गत दोन हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देण्यात येतात. हे पैसे प्रत्येकी 2000 रुपये अशा तीन हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जातात.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….