कृषी कायदा पुन्हा येणार असं म्हंटलंच नाही :- केंद्रीय कृषिमंत्र्याचा यू-टर्न….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- तब्बल एक वर्ष चाललेल्या शेतकरी आंदोलना नंतर पंतप्रधान मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले. पण, आता हेच कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात असं विधान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. मात्र, त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरून युटर्न घेत मी असं कधीच बोललो नाही, असं सांगितलं आहे.
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. वर्षभर चाललेल्या या आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोदींनी अचानक कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांनी संसदेत हे कायदे मागे घेतले. पण, सरकारने कायदे मागे घेतल्यानंतर आम्ही परत कायदे आणू शकतो, अशा कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल होते कृषिमंत्री? –
आम्ही कृषी दुरुस्ती कायदा आणला. पण काही लोकांना हा कायदा आवडला नाही. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही मोठी सुधारणा होती. पण, आम्ही ते कायदे मागे घेतले. आम्ही एक पाऊल मागे आलो आहोत. मात्र, आम्ही पुन्हा पुढे जाऊ शकतो. कारण शेतकरी हा भारताचा कणा आहे. सरकार पुन्हा हे कृषी कायदे लागू करू शकते असे संकेत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले होते.
केंद्रीय कृषिमंत्र्याचा यूटर्न –
भारत सरकारने चांगले कायदे बनवले होते. पण, काही अपरीहार्य कारणांमुळे आम्ही कायदे मागे घेतले. भारत सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करतेय. मी कृषी कायदे मागे आणू असं कधीच म्हटलं नाही, असं म्हणत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला.