भरधाव आयचरच्या धडकेत एक ठार ; चालक फरार # महागाव तालुक्यातील भांब येथील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
फुसावंगी कडून महागाव कडे भरधाव वेगाने येणाऱ्या आयचर वाहनाने एक व्यक्तीस जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.ही घटना महागाव तालुक्यातील भांब येथे काल (ता.२४) रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. नथू फकिरा राठोड (४९)रा.भांब
असे मृतकाचे नाव आहे.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
भांब येथील नथू राठोड हे रस्त्याने जात होते.

अश्यातच भरधाव वेगाने महागावच्या दिशेने आयशर क्रमांक एमएच २९ बीई १६८० ने पाठीमागून जोरदार धडक दिली.हा अपघात एवढा भयंकर होता की धडकेनंतर सदर वाहन अंगावरून गेल्याने नथू राठोड जागीच गतप्राण झाले.वाहन चालक याने वाहन सोडून घटनस्थावरून पोबारा केला.मृतक नथू फकिरा राठोड पश्चात पत्नी, १ विवाहित मुलगी,२अविवाहित मुले आहेत. वृत्तलीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!
भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार..? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी….