राज्यातील 105 नगर पंचायती साठी मतदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्यात आज 105 नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे.
मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
या प्रमुख नगरपंचायतीच्या लढतींकडे लक्ष
मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ ( सिंधुदुर्ग ), देहू (पुणे-नवनिर्मित नगरपंचायत), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी ( सातारा ), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), तर, सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित नगरपंचायत), वैराग (नवनिर्मित नगरपंचायत), नातेपुते (नवनिर्मित नगरपंचायत) या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष आहे.
भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती नगर पंचायतीच्या थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे ..भंडारा जिल्हा परिषदेच्या 39 जागासाठी पंचायत समितीच्या 79 जागा तर नगर पंचायतिच्या 39 जागासाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 43 जागा नगर पंचायतिच्या 86 जागा तर पंचायत समितीच्या 45 जागासाठी हे मतदान होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात विजय वडेट्टीवार, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला
पोंभुर्णा – एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना16 आणि राष्ट्रवादी15 जागा लढवत आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला.
गोंडपिंपरी – एकूण जागा -17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस17, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 13 जागा लढवत आहे.
कोरपना – एकूण जागा – 17, या ठिकाणी काँग्रेसने सर्व 17 जागांवर आपले उमेदवार दिले आहे तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना यांची छुपी युती आहे. या सर्व पक्षांनी काँग्रेस विरुध्द मिळून आपले उमेदवार दिले आहे. या ठिकाणी भाजप 10, राष्ट्रवादी 02, शेतकरी संघटना 04 आणि शिवसेना 01 जागा लढवत आहे. भाजप आपल्या कमळ या चिन्हावर लढत आहे तर राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना हे टेबल या चिन्हावर लढत आहे.
जिवती – एकूण जागा – 17, या ठिकाणी भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती असून गोगपा 10 आणि भाजप 07 जागा लढवत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असून काँग्रेस 09 आणि राष्ट्रवादी 08 जागा लढवत आहे. शिवसेना स्वतंत्र पणे निवडणूक लढत असून 10 जागी त्यांनी उमेदवार दिले आहेत.
सिंदेवाही – एकूण जागा – 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 16 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला
सावली – एकूण जागा – 17, या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढवत आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….