सरकार लोकशाहीची हत्या करीत आहे :- राहुल गांधीची केंद्र सरकार वर टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- संसदेत विरोधी पक्षाने सातत्याने आणलेल्या स्थगन प्रस्तावांबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आणि आरोप केला की, मोदी सरकार लोकशाहीची हत्या करत आहे.
महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित करणाऱ्या विरोधकांना रोखत आहे. पंतप्रधान मोदी सभागृहातून का गायब आहेत, असा सवालही त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, हे कसे सरकार आहे ज्यांना सभागृह सांभाळता येत नाही. महागाई, लखीमपूर, एमएसपी, लडाख, पेगॅसस, निलंबित सदस्य यांसारख्या मुद्द्यांवर आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. त्यांनी सरकारला आव्हान दिले की, हिंमत असेल तर चर्चा होऊ द्या.
दुसरीकडे समाजवादी पार्टीनेही सरकारविरुद्ध आवाज उठविला आणि आरोप केला की, भाजप सरकार विरोधकांना भीती दाखवित आहे. अखिलेश यादव म्हणाले की, सरकार फोन टॅप करत आहे, तर दुसरीकडे ईडी, आयकर आणि अन्य एजन्सींचा दुरुपयोग करुन धाडी टाकल्या जात आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचाही आरोप होता की, मोदी – योगी सरकार बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करत आहेत.
पेगॅसस मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. अन्य देशात भारताचा डेटा ठेवण्यात आला होता. याची चर्चा होऊ दिली नाही. हे तर लोकशाहीवरील आक्रमण आहे. त्याविरुद्ध आम्ही लढत आहोत.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….