रामदास कदम शिवसेना सोडणार…? पत्रकार परिषदेत फोड़णार बॉम्ब….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार असून मोठा निर्णय जाहीर करणार असल्याचं बोललं जातंय.
मागील अनेक दिवसांपासून त्यांचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता. फडणवीस सरकार असताना कदम यांच्याकडे मंत्रीपद होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर मात्र, त्यांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आलं. यातच किमान विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची अपेक्षा होती. मात्र ती संधीही डावलण्यात आल्याने कदम नाराज असल्याचं बोललं जातंय. यातूनच ते निर्णय जाहीर करणार आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेनेचा मुंबईतून उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. शिवसेना नेते रामदास कदम यांना ही जागा मिळणार की नाही? त्यांना डावललं जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच आज शिवसेनेनं अखेर उमेदवारी जाहीर केली. यावेळी रामदास कदम यांचा पत्ता कट करून एका वेगळ्या उमेदवाराला संधी देण्यात आली. त्यामुळे कदम नाराज असल्याची चर्चा होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..