महाविकास आघाडीत ठरलं भाजपला धक्का देण्याची तयारी ; जागा वाटपाच्या फार्मूला निश्चित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी मुंबई :- विधान परिषद निवडणुकीत ६ पैकी ४ जागा जिंकल्यानं भाजपचं मनोबल उंचावलं आहे. या निवडणुकीनंतर भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातच पुढील वर्षाच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.
यापैकी नवी मुंबईत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. नवी मुंबई महापालिकेची सत्ता भाजपकडे आहे. भाजपला धक्का देण्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतील महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळापूर्वी संपन्न झाली. त्यामध्ये पुढील महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, संदीप सुतार उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील निश्चित करण्यात आला.
नवी मुंबईत महापालिकेतील एकूण सदस्य संख्या १११ इतकी आहे. त्यात आता १० जागांची भर पडणार आहे. त्यामुळे हा आकडा १२१ वर जाईल. यापैकी ७५ ते ८० जागा शिवसेना लढवेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस २० ते २५ आणि काँग्रेस १८ ते २२ जागांवर उमेदवार देतील. एबीबी माझानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत महापालिका निवडणूक होऊ शकते.
पुढील महापालिका निवडणुकीत सत्ता राखण्याचं आव्हान भाजप नेते गणेश नाईक यांच्यासमोर आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी नाईक भाजपमध्ये गेले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या बऱ्याचशा नगरसेवकांनी हाती कमळ घेतलं. त्यामुळे राष्ट्रवादीला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..