हिवाळी अधिवेशनात होणार विधान सभा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- येत्या २२ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात winter session of the state legislature विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक Election of Assembly Speaker घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
विधानसभा नियम समितीची बुधवारी बैठक पार पडली, त्यात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्यात आला असून, आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्यात प्रस्ताव तयार करण्यात आला.
ही निवडणूक गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. विधानसभा नियम समितीच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्याचा निर्णय झाला असून आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियम बदलाचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचेही कळते.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. मात्र, ही निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेताना काही आमदार फुटण्याची भीती सत्ताधाऱ्यांना वाटते. अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव हा प्रस्ताव संमत करायचा असेल तर सभागृहात बहुमताची गरज आहे. महाविकास आघाडीकडे २८८ पैकी १७० इतके संख्याबळ आहे.
तर भाजपचे विधानसभेत १०६ सदस्य आहेत. गुप्त मतदान पद्धतीत १७० चा आकडा कायम राहणार नाही अशी महाविकास आघाडीला शंका वाटते. बहुमत सिद्ध करताना असलेले १७० चे आघाडीचे संख्याबळ जर विधानसभा अध्यक्ष निवडीत घटले तर सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक लावून धरू शकतात. त्यामुळेच निवडणूक घेण्याच्या आधीच नियमात बदल करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव होता. त्यानुसार आता गुप्त मतदानाऐवजी आवाजी (हात वरती करून, उघड पद्धतीने) पद्धतीने मतदान करण्याचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार असून, प्रस्ताव मंजूर झाल्यास विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग राज्य सरकारसाठी सुकर होणार आहे.