कोव्हिड -19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य ; तालुका प्रशासनातर्फे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोफत सेवा उपलब्ध…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 14 डिसेंबर :- कोव्हिड -19 आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास शासनातर्फे सानुग्रह सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यवतमाळ तालुका प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यवतमाळ शहरात अर्ज भरण्यासाठी आपले सरकार/महा-ई-सेवा/सेतु सेवा केंद्र येथे विनामुल्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यात सेतु सेवा केंद्र, तहसिल कार्यालय परीसर, यवतमाळ (मोबाईल क्रमांक-९९२२१११४६७), आपले सरकार सेवा केंद्र,तहसिल चौक,यवतमाळ (मो. ७२१८१३१२३१), महा-ई-सेवा/आपले सरकार सेवा केंद्र, शनी मंदीरचौक, यवतमाळ (मो.७५८८९७१८७१), सेतु सेवा केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, परीसर (मो. ७०२०४८२७२५), आपले सरकार सेवा केंद्र,स्टेट बँक चौक, धामनगाव रोड, यवतमाळ (मो. ८६०५५८१६७४) या केंद्रावर मोफत अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कोव्हीड मुळे मृत व्यक्तीचे मृत्यु प्रमाणपत्र, कोविड पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, अर्जदाराचे आधारकार्ड, बँक पासबुक, रद्द केलेला बॅक चेक व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
तरी संबंधीतांनी या सुविधेचा लाभ घेणेकरीता वरीलप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन ऑनलाईन मोफत सेवेचा लाभ घ्यावा, असे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी कळविले आहे.