‘म्हाडा’ भरतीची परीक्षा TCS-IBPS च्या मदतीने होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- ‘म्हाडा’ सरळसेवा भरती (MHADA Exams) परिक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पेपर फोडण्याचा कट उघड झाल्याने ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली.
यानंतर ‘म्हाडा’ स्वतः परीक्षा घेईल, असे राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी (jitendra awhad) जाहीर केले. मात्र, ‘म्हाडा’ एवढ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सक्षम नसल्याने अखेर विविध परीक्षांचा दांडगा अनुभव असलेल्या (TCS) ‘टीसीएस’, ‘आयबीपीएस’ (IBPS) या कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्याचा पर्याय म्हाडा प्रशासनाने निवडला आहे. यासाठी म्हाडा प्रशासन दोन्ही कंपन्यांनाशी पत्रव्यवहार करणार आहे.
‘टीसीएस’, ‘आयबीपीएस’ या कंपन्यांमार्फत परीक्षा घेणार?
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) आस्थापनेवरील विविध १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी ‘जीए सॉफ्टवेअर’ या कंपनीची निवड करण्यात आली होती. राज्य सरकारने भरती परीक्षांसाठी निवडलेल्या कंपन्यांपैकी एक कंपनी परीक्षेसाठी नेमणूक करण्यासाठी ‘म्हाडा’ने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने ‘जीए सॉफ्टवेअर’ या कंपनीचे सादरीकरण पाहून तिची परीक्षेसाठी निवड केली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग करत पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकारवर परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती.
परीक्षा शुल्क परत करणार
ऐनवेळी परीक्षा रद्द केल्याने उमेदवारांचा गोंधळ उडाला होता. अखेर गृहनिर्माण मंत्र्यांनी भरती परीक्षा ‘म्हाडा’ स्वतः घेईल, असे जाहीर केले. तसेच सर्व उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. आगामी परीक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी ‘म्हाडा’ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
एवढ्यांची परीक्षा अशक्य

‘म्हाडा’ प्रशासनामार्फत पावणेतीन लाख उमेदवारांची परीक्षा घेणे अशक्य असल्याने अखेर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या ‘टीसीएस’, ‘आयबीपीएस’ या कंपन्यांमार्फत परीक्षा घेण्यासाठी विचारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ‘म्हाडा’ या कंपन्यांकडे परीक्षा घेण्यास इच्छुक आहात काय? याची विचारणा करणार आहे.
‘जीए सॉफ्टवेअर’ला नोटीस बजावणार
म्हाडा भरतीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यानेच पेपर फोडल्याने ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागली. यामुळे म्हाडाची बदनामी झाली असून उमेदवारांनाही त्रास झाल्याने ‘म्हाडा’ जीए सॉफ्टवेअर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. कंपनीकडून उत्तर आल्यानंतर कंपनीवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..