रेल्वे भरती 2021 ; मध्य रेल्वे मध्ये परीक्षे शिवाय भरती होण्याची संधी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- रेल्वे भर्ती सेल (RRC) ने मध्य रेल्वेमध्ये (Central Railway) क्रीडा कोट्याअंतर्गत (Sport quota) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
उमेदवार RRC मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrccr.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत स्तर 5/4 आणि 3/2 ची एकूण 21 पदे भरली जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.
पद (Vacancies):
स्तर 5/4: 3 पोस्ट
स्तर 3/2: 18 पोस्ट
पात्रता (Eligibility):
स्तर 5/4: कोणत्याही शाखेतील पदवीधऱ.
स्तर 3/2: 12वी पास किंवा मॅट्रिक आणि ITE.
(क्रीडा पात्रतेसंदर्भातील माहितीसाठी अधिसूचना पहा)
वयोमर्यादा (Age Eligibility)-
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे. 1 जानेवारी 2022 पासून वयाची गणना केली जाईल. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1997 ते 1 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.
निवड-
पात्र अर्जदारांची चाचणी आधारावर भरती केली जाईल. चाचणी 40 गुणांची असेल, ज्यामध्ये 25 किंवा त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना पुढील फेरीसाठी निवडले जाईल.
अर्ज फी (Form fees)-
SC/ST/माजी सैनिक/PWD/महिला श्रेणी – रु.250. (अधिसूचनेनुसार पात्र ठरलेल्या आणि चाचणीसाठी हजर झालेल्या उमेदवारांना फी परत केली जाईल.)
इतर सर्व श्रेणीतील उमेदवार – रु.500.
(सूचनेनुसार पात्र ठरलेल्या आणि चाचणीत हजर झालेल्या उमेदवारांना 400 रुपये परत केले जातील.)

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….