नागपुर विधान परिषद :- भाजपचे बावनकुळे विजयी तर कॉंग्रेसला धक्का…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल भाजपच्या बाजुने लागला आहे.
एकतर्फी विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाले झाले आहेत. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती.
महाविकास आघाडीचा पराभव
नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून व्यक्त करण्यात येत आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी घेतली होती. माजी ऊर्जा मंत्री तसेच भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष मंगेश देशमुख यांच्यात थेट लढत झाली.
559 मतदारांपैकी 554 मतदारांनी या निवडणुकीत हक्क बजावला. यात बावनकुळे यांना 362 मते मिळालीत तर मंगेश देशमुख यांना 186 मते मिळालीत. तर 5 मते बाद झालेत. तसेच भाजपमधून काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….