विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकार मतदार संघा साठी ९८ : ३० टक्के मतदान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अकोला :- अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी शुक्रवार, ता.१० डिसेंबर रोजी तिन्ही जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. तिन्ही जिल्ह्यातील एकूण ८२२ मतदारांपैकी ८०८ मतदारांनी दुपारी ४ या निर्धारित वेळेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला.
मतदानाची एकूण टक्केवारी ९८.३० टक्के एवढी होती.
विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारासंघासाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया व भाजपतर्फे वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी तिन्ही जिल्ह्यातील २२ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. एकूण ८२२ मतदार होते. त्यात ३६७ पुरुष आणि ४३५ स्त्री महिला मतदार होते. त्यापैकी ८०८ मतदारांनी मतदान केले. ३८७ पुरुष मतदारांपैकी ३७९ आणि ४३५ स्त्री मतदारांपैकी ४२९ मतदारांनी मतदान केले. तिन्ही जिल्ह्यात शांतेत मतदान झाले.
१४ मतदारांची पाठ
विधान परिषदेच्या अकोला, बुलडाणा, वाशीम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदानाकडे १४ सदस्यांनी पाठ फिरविली. त्यात आठ पुरुष तर सहा महिला मतदारांचा समावेश आहे.
२२ पैकी १७ केंद्रांवर १०० टक्के मतदान
तिन्ही जिल्ह्यातील २२ पैकी १७ केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर केंद्रांचा समावेश आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, मंगरुळपीर, रिसोड या चारही केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. बुलडाणा जिल्ह्यात चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि नांदुरा या केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. बुलडाणा येथे एक सदस्यांनी मतदान केले नाही. सर्वात कमी मतदान बार्शीटाकळी येथे ७५ टक्के झाले. येथे २० पैकी १५ सदस्यांनी मतदान केले तर इतर पाच मतदार हे मतदानाच्या दिवशी बार्शीटाकळीतून गायब असल्याची चर्चा आहे.
जिल्हानिहाय २२ केंद्रावर झालेले मतदान
जिल्हा मतदान केंद्र एकूण मतदार झालेले मतदान
अकोला ७ २८७ २८१
वाशीम ४ १६८ १६८
बुलडाणा ११ ३६७ ३५९
एकूण २२ ८२२ ८०८