शाळा विषयी एकत्रित निर्णय 15 डिसेंबरला ; आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत सोमवारी निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात कुठे शाळा बंद तर कुठे सुरू असल्याने निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पृष्ठभूमीवर आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात येईल.
15 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शुक्रवारी येथे दिली.
राज्यभरातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असे पवार म्हणाले.
नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा 13 डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. तर औरंगबाद महापालिकेने 15 डिसेंबर पर्यंत वाट पाहिल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले. आता बुधवारी राज्य पातळीवर सरकार काय निर्णय घेते, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत सोमवारी निर्णय
आरोग्य भरतीबाबत अजित पवार म्हणाले की, आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे. आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यात जे दोषी असतील, त्यांना अशी शिक्षा करू की, पुन्हा कोणाची पेपर फोडण्याची हिंमत होणार नाही.