अंबोडा येथे मामा – भाच्याला लुटले ; तिघांवर गुन्हा दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
यवतमाळ :
महागाव येथून माहूर कडे दुचाकीने जात असताना अंबोड्यानजीक अतिथी हॉटेल जवळ मामा व भाच्याला लुटल्याची घटना काल (ता.१ डिसेंबर) सायंकाळी साडेसात वाजता समोर आली आहे.या प्रकरण पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
आकाश पावडे , राहुल पावडे दोघेही रा. अंबोडा अशी आरोपींची नावे असून एका अज्ञात लुटारुचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीच एकाला अटक केली आहे.तर दोघे पसार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहिती नुसार ,
फिर्यादी रियाज अकबानी हे भाचा जिशान फाजलानी याला घेवून माहूर येथे भावाकडे जात आहे होते.दरम्यान आंबोडा जवळ असलेल्या अतिथी हॉटेल जवळ अज्ञात तिघांनी दुचाकी अडवली.रियाज आणि जिशान यास जबर मारहाण व शिवीगाळ करून खिश्यातील
नगदी ४ हजार रुपये हिस्कावले.या प्रकरणी फिर्यादी रियाज अकबानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३९२,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत.

शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
महागाव भाजपा तालुकाध्यक्षांमुळे उमरखेड विधानसभेत होणार भाजपा उमेदवाराची पीछेहाट ?
सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..