उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा बँक निवडणूक रिंगणात…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (पीडीसीसी) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी अर्ज भरला. गुरुवारी दिवसभरात 31 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत संचालक पदाच्या 21 जागांसाठी 34 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक असून मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. गुरुवारी अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकांमार्फत सादर केला. अजित पवार हे ‘अ’ वर्ग बारामती तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.
दरम्यान, याच मतदारसंघातून सतीश काकडे यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या मतदारसंघात दोन उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि.23 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत 34 उमेदवारांनी 60 उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर, 132 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
अर्ज भरलेले उमेदवार…
उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अशोक पवार, सुनील चांदेरे, रणजित निंबाळकर, सरोजिनी मोकाशी, रनींद्र काळे, भालचंद्र जगताप, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, वंदना काळभोर, प्रकाश जगताप, भाऊसो सपकळ, सतीश खोमणे, दादासाहेब फराटे, दिलीप काळभोर, रामभाऊ टुले, विकास दांगट, जयश्री खेडेकर, स्वप्निल गायकवाड.