डीबी पथकातील वादग्रस्त वास्टर, कोकाटे,जाधव अखेर निलंबित जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश; पोलीस दलात खळबळ
डीबी पथकातील वादग्रस्त वास्टर, कोकाटे,जाधव अखेर निलंबित
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश; पोलीस दलात खळबळ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
पुरुषोत्तम कुडवे ९८२२८८७०६५
दिग्रस :-
दिग्रस पोलिस स्टेशनच्या डीबी पथकातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (ता.१७) ला निलंबित केले आहे. शहरासह तालुक्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अवैद्य धंद्यांना तसेच गुन्हे डिटेक्ट करण्याचे काम या डीबी पथकावर अवलंबून असते. मात्र या खाकीतील वादग्रस्त नितीन वास्टर, अरविंद कोकाटे, अरविंद जाधव या त्रिकुटाने खाकी ची कोणतीही तमा न बाळगता पोलिस विभागाची गोपनीयता भंग करणे तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या सोबत हितसंबंध ठेवणे अवैध धंद्यांना प्रोत्साहन तसेच अवैध धंद्यात पार्टनरशिप गोरखधंदा खाकीतील त्रिकुटाने अवलंबून कायद्याचे धिंडवडे उडवीत जुगार गुटका अवैद्य धंदे या लोकांवर रेड मारून लाचेची मागणी तसेच चोरी, घरफोड्या यासारख्या गुन्हे उघडकीस न आणता स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाची मागणी करणे व गवळीपुरा भागात राशनच्या मालाच्या साठवणुकीच्या मालावर छापा मारून कायदेशीर कारवाई ऐवजी लाचेची मागणी करून तीस हजार रुपये रक्कम स्वीकारून उर्वरित रक्कम रकमेसाठी तगादा लावल्याने तक्रारदार गुलाब हुसेन औरंगाबाद राहणार चांदनगर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्याचे समजताच पोलीस हे त्रिकुटाने सिक रजेवर गेले. तसेच वर्दीचा धाक दाखवित सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात धमक्या देत पैशाची उकळणे करण्याचा गोरखधंदा उघडकीस आल्याने तसेच खाजगी वाहने अडवून तसेच खाजगी वाहनात सामान्य नागरिकांना खोटे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पोलीस स्टेशनला आणून दम देणे तसेच पोलीस खात्यामध्ये कार्यरत असतानाही अवैद्य धंद्यामध्ये लिप्त होण्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलिसांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलीन केल्यामुळे या त्रिकुटा विरुद्ध शिस्तभंग विषयक विभागीय कार्यवाही च्या अधीन राहून मुंबई पोलीस शिक्षा आणि अपील नियम 1964 नियम ३(१)(अ-२)मधील तरतुदीनुसार त्वरित प्रभावाने या त्रिकुटाला शासकीय सेवेतून निलंबित करण्याचे आदेश पारित करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे
———————————-