आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासीयांशी संवाद…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करणार आहेत . त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली . कोरोना काळात मोदींचे हे 7 संबोधन असणार आहे . याआधी त्यांनी 30 जून रोजीच्या संबोधनात ते 17 मिनिटे बोलले होते . सध्या देशात लॉकडाऊन ५.० सुरु आहे . देशात अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत . ट्रेन , विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाली नसली , तरी मेट्रो , रस्त्यावरील वाहतूक , हॉटेल , सिनेमा हॉल सुरु झाले आहेत.सध्या नवरात्रौत्सव सुरु आहे . पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे . सणांचे हे दिवस देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत . लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे . पण अजूनही अर्थव्यवस्थेची गाडी पूर्णपणे रुळावर आलेली नाही . सणवाराच्या या काळात मोठी उलाढाल अपेक्षित आहे . त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने काय घोषणा करणार ? नवीन पॅकेज जाहीर करणार का ? कर्जदारांना दिलासा मिळणार का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या मोदींच्या संबोधनात अपेक्षित आहे .

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..