जिल्ह्यात 55 जणांची कोरोनावर मात दोघांचा मृत्यु ; 48 जण नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 20 :-
जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 48 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 55 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
मृतकांमध्ये पुसद येथील 67 वर्षीय आणि वणी तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात एकूण 566 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 48 नव्याने पॉझेटिव्ह तर 518 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत 499 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9571 झाली आहे. मंगळवारी 55 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8599 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 307 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 86019 नमुने पाठविले असून यापैकी 85425 प्राप्त तर 594 अप्राप्त आहेत. तसेच 75854 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….