कामचुकार ग्राम सेविकेची गळफास नौटंकी कशासाठी ? स्वतः च फोटो केला व्हायरल; जिल्हात चर्चा..
पुरुषोत्तम कुडवे ९८२२८८७०६५
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिग्रस :-
तालुक्यातील कामचुकार ग्राम सेविकेने आपल्या राहत्या खोलीत स्वतः गळफास घेतल्याचे सेल्फी काढून पी एम वाय ग्रुपवर फोटो व्हायरल केल्याने तालुक्यात प्रशासनामध्ये चांगलीच तारांबळ उडाली. आणि कार्यरत सहकार्यासह सरपंचांनी तिच्या घराकडे धाव घेतली. पाहता पाहता तोबा गर्दी झाली.या घटनेची वार्ता तालुक्यात वार्यासारखी पसरली. अन् अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा तुर्तास तरी रक्त दाब वाढला.
मुदत संपल्या मुळे ग्रामपंचायत वर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. मात्र कामचुकार ग्राम सेविकेने अध्याप पर्यंत आर्थिक व्यवहाराचे खाते बदल केले नाही. त्यामुळे नागरिकांचे अनेक कामाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कामचुकार ग्राम सेविकेच्या कारभारा विषयी तोंडी व लेखी तक्रारी कार्यालयात असल्याचे बोलले जाते. नागरिकांना असभ्य भाषेत बोलणे.कामे वेळेत न करणे, लोकांना खोट्या गुन्हात अडकविण्याची धमकी देणे, असे एक ना अनेक प्रताप करत असल्याचे त्या कामचुकार ग्राम सेविकेबदल बोलले जाते. अधिकारी किंवा पदाधिकार्यांच्या आदेशाचे पालन न करणे, आपल्या मनमानी कारभार कोणीही वाकडी नजर टाकु नये, सरपंचाला फालतू समजणे, विश्वासात न वाटेल ते काम करणे, ठेकेदाराला स्वच्छालयाच्या चेक साठी फिरवणे, त्या कामचुकार ग्राम सेविकेने स्व:ताचा गळफास घेतल्याचा सेल्फी काढून पी एम वाय ग्रुपवर व्हायरल करून ग्राम सेविका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांवर दबावतंत्र निर्माण करत असल्याचे दिवस भर बोलले जात आहे.
यापूर्वी त्या कामचुकार ग्राम सेविकेची बदली करण्यात आली होती. मात्र बदली रद्द करण्यासाठी जालना जिल्ह्यात एका मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या अधिका-यांकडे सेटीग लावून त्याच ठिकाणी कायम राहण्याची इच्छा पूर्ण करून घेतली. एवढे पाठबळ असताना गळफास नौटंकी का?व कशासाठी!तर प्रशासनाला व पदाधिकाऱ्यांना इमोशनल ब्लॅकमेल तर करायचे नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात होत होती.अनेक वादग्रस्त कामात व आर्थिक व्यवहारात ‘सु’नीलच्या नावाची चर्चा समोर येत आहे. मग स्वतः गळफास लावून सेल्फी काढून व्हायरल करण्याची नौटंकी कशासाठी असा प्रश्न प्रशासनासह लोकप्रतिनिधीना सतावत आहे. आत्यमहत्या करणे किंवा धमकावने हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे त्या कामचुकार ग्राम सेविकेच्या चांगलेच अंगलट येणार असल्याचे सहकारी कर्मचारी संघटनेकडून असा सुर निघत आहे. जिल्हा परिषद कार्यालय काय कारवाई करणार याकडे जिल्हाचे लक्ष्य लागले आहे.