लोकसंख्येनुसारच आरक्षण हवे..! ; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “गोव्यातील अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्टपणे भूमिका मांडताना आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात दिले गेले पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले.
तसेच एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळ स्तरावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. पर्वरी येथील मंत्रालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवले म्हणाले की, गोव्यातील एसटी समाजाकडून राजकीय आरक्षणाची मागणी सातत्याने पुढे येत आहे. या विषयावर राज्य सरकारने काही प्राथमिक चर्चा केली असून, हा मुद्दा केंद्राकडे प्रलंबित आहे. एसटी समाजाच्या लोकसंख्येचा अचूक विचार करून त्यांना न्याय्य व योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
अनुसूचित जाती (एससी) तसेच अनुसूचित जमाती (एसटी) समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल. दिल्ली स्तरावरही या मागणीचा गांभीर्याने विचार होईल आणि समाजाच्या हिताचे निर्णय व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
आगामी निवडणुकीत भाजप आघाडीला ३० जागा मिळणार
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना रामदास आठवले यांनी गोव्यात भाजपप्रणीत आघाडीला ३० जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत सरकारने केलेली विकासकामे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि केंद्राचे पाठबळ यामुळे जनतेत सकारात्मक वातावरण निर्माण आहे. राज्यातील विविध विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांचा लाभनागरिकांपर्यंत पोहोचल्याने जनतेचा विश्वास वाढला असल्याचा दावा त्यांनी केला.
गोव्यात एसटी राजकीय आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून अधिक तीव्र झाला असून विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजप्रतिनिधींकडून या मागणीला जोरदार पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आठवले यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यात विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध क्षेत्रांत प्रभावी कामगिरी केली असल्याचे आठवले यांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, सामाजिक कल्याण योजना आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारकडून गोव्याला मिळालेल्या विविध प्रकल्पांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे. तथापि, लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचाच असतो आणि जनतेने दिलेल्या कौलाचा पूर्ण आदर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?