नांदेड रेल्वे स्थानकावर उभ्या रेल्वे डब्याला भीषण आग ; रस्ता नसल्याने अग्निशमन दलास अडचण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- “येथील रेल्वे स्थानकावर मेंटेनन्स सेक्शनच्या पटरीवर उभ्या असलेल्या एका रिकाम्या रेल्वे डब्याला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने संबंधित डबा रिकामा असल्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, रेल्वे यार्डातील वाढत्या उष्णतेमुळे लागलेल्या या आगीने रेल्वे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडवून दिली.
योग्य रस्ता नसल्याने अग्निशमन दलाची अडचण
रेल्वेच्या डब्यातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे दिसताच रेल्वे कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, ज्या पटरीवर हा डबा उभा होता, तो भाग आतल्या बाजूला असल्यामुळे आणि तिथपर्यंत फायर ब्रिगेडच्या गाड्या जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागला. रस्ता नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात काहीसा विलंब झाला.
४५ मिनिटांच्या शर्थीनंतर आगीवर नियंत्रण
अडचणीच्या परिस्थितीतही फायर ब्रिगेडचे जवान, रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी पाण्याच्या पाईप्स आणि इतर यंत्रणेच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सुमारे ४५ मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत डब्याचे अंतर्गत नुकसान झाले आहे.
कारण अद्याप अस्पष्ट
दरम्यान, या आगीचे नेमके तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात सध्या ४४ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद होत असून, उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमुळे व शॉर्टसर्किटमुळे अशा आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?