राज्यात ‘ऑपरेशन टायगर’चा थरार? संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “‘ऑपरेशन टायगर’ होणार असून योग्य वेळी मोठे बदल दिसतील. ठाकरे गटाची ताकद कमी झाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील भूमिकेवरून आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार
राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार असून त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागेल, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या नव्या दाव्याने पुन्हा एकदा राज्य राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. योग्य वेळी मोठा राजकीय बदल घडेल. ठाकरे गटाकडे आता पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय दीना पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आता या ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटसप्रमाणेच ‘ऑपरेशन टायगर’चीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, ‘दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळात फेरबदलासारखे निर्णय तोंडी घेतले जात नाहीत, तर योग्य वेळी घेतले जातात, असही शिरसाट यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावरून आमदार महेश शिंदे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली असता, ते म्हणाले की महेश शिंदे संतप्त असून मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याशी संवाद साधला होता. आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेण्याचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आज मंगळवारी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयाला भेट देऊन ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या पत्नीच्या प्रकृतीची विचारपूस केली. पाटील यांच्या पत्नी पल्लवी नुकत्याच एका अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खळबळ
यापूर्वी, ठाकरे सेनेचे आठ खासदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांनी ठाण्यात डीसीएम शिंदे यांची भेटही घेतल्याच्या चर्चा राजयकीय वर्तुळात सुरू होत्या. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र या भेटीच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याही पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे.
गेल्या महिन्यात २५ तारखेला शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला जाधव आणि त्यांचे काही समर्थक उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद अनेराव यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती केली आहे.
यावरून अनेक वाद निर्माण
शिंदे यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यापूर्वीही शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची रुग्णालयात भेटही घेतली होती. शिंदे यांच्या या भेटीकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असले तरी, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अनेक वाद निर्माण होत आहेत.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….