इंदिरा गांधींजी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे 4 तुकडे केले असते, नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. इंदिरा गांधींजी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे करुन टाकले असते असे पटोले म्हणाले.
काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला पाकिस्तानच्या आदेशानेच झाला आहे. भारताने पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं, ही काँग्रेसची भूमिका आहे, असे म्हणत नाना पटोलेंनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
पाकिस्तानवर हल्ला करून जशास तसं उत्तर दिलं पाहिजे
इंदिरा गांधीजी आता असत्या तर पाकिस्तानचे आतापर्यंत चार तुकडे करून टाकले असते. बलुचिस्तान हा वेगळा देश झाला पाहिजे अशी तिथल्या लोकांची मागणी आहे. काश्मीरमधील पर्यटकांवर केलेला हल्ला हा पाकिस्तानच्या आदेशांन केला हे सिद्ध झालं आहे. मग अशा पद्धतीत देशातलं सरकार का शांत आहे? हा एक प्रश्न निर्माण होतो असे पटोले म्हणाले. आमचे नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सांगितलेलं आहे की, आम्ही सरकारसोबत आहे. मात्र, या घटनेला साधं न समजता पाकिस्तानवर हल्ला करून जशास तसं उत्तर दिलं पाहिजे, अशी भूमिका आमच्या नेत्यांनी भूमिका घेतली आहे. केंद्राच्या सरकारनं जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका घेतलेली नाही. या हल्ल्यानंतर ज्यांच्याकडे या घटना घडल्या त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाही. प्रधानमंत्री ज्या प्रकारे हास्यकल्लोळात आहे, ती भूमिका या देशातील नागरिकांना नं पचणारी आहे. आमची अपेक्षा आहे की आपलं सरकार पाकिस्तानला जशास तसं उत्तर देईल.
जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं राहुल गांधींनी स्वागत केलंय
जातीनिहाय जनगणनेवर भाजपने राहुल गांधी यांचा पदोपती अपमान केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला याचे राहुल गांधींनी स्वागत केलं आहे. देशहितासाठी जे निर्णय असेल त्याचं काँग्रेस स्वागत करेल. पूर्ण ओबीसीची जनगणना केली तर ते थोतांड होईल. त्याचा जीआर काढायचा असेल तर विचारून काढल्यास त्याचा सर्व स्तरातील नागरिकांना लाभ होईल अशी भूमिका राहुल गांधींची आहे.
मतं घेऊन झाल्यानंतर बहिणींशी बेमानी करण्याचं काम सरकारनं केलंय
विविध योजनांचा लाभ महिलांना देत आहेत. मते घ्यायच्या वेळेस सरकारला नियमावली नव्हती. मतं घेऊन झाल्यानंतर बहिणींशी बेमानी करण्याचं काम फडणवीस सरकार करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानिक हक्क आणि लाभ मिळावं अशी भूमिका अनुभवली होती. पण या महापापी सरकारनं बहुजनांचे पैसे काढून लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय निषेधार्थ आहे. तुमच्यात धमक नव्हती तर तुम्ही या घोषणा करायच्या नव्हत्या होत्या. मोठ्या श्रीमंतांचे कर्ज माफ करायला तुमच्याजवळ पैसे आहेत. गरीब बहिणीला पाचशे रुपये द्यायला पैसे नाहीत. दुसरा बहुजनांचे पैसे काढून देत आहेत त्याचा आम्ही विरोध करतोय. या सरकारला आम्ही एकेक पैशाचा जाब विचारु असे नाना पटोले म्हणाले.
खोटारडं आणि बेईमान सरकार
हे खोटारडं आणि बेईमान सरकार आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी हे सगळे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांशी पदोपदी बेइमानी करणं हा त्यांचा धर्म आहे. यांच्या कृत्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यांच्या खोट्या आश्वासनामुळे अनेक निरपराध शेतकरी फसले गेलेत. या सरकारनं शेतकऱ्यांना जे आश्वासन दिले ते पूर्ण केले पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही विधानसभेत असो की रस्त्यावर उतरून या सरकारला धारेवर धरु आणि शेतकऱ्यांना धनाचा बोनस असो की कर्जमाफी असो यावर आम्ही हे घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे नाना पटोले म्हणाले.

महाराष्ट्र एकवटणार..! राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली; दोन ऐवजी एकच मोर्चा, शिवसेनेला चर्चेसाठी प्रस्ताव….
पुसदच्या मुस्लिम बांधवांनी लाईट बंद करून ‘वक्फ कायदा 2025’ चा शांततेच्या मार्गाने केला विरोध ; संपुर्ण पुसद शहरातील मुस्लिम समाजाचा लाईट बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग….
महागाव येथे सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; महागाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध मान्यवरांचा पुरस्काराने केला जाणार सन्मान….
गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यासह आशिष शेलारसुद्धा उपस्थित….
दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर, विरोधकांचा सभात्याग…!
भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ; पंकजा मुंडेंकडं महत्त्वाची जबाबदारी….
ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….