गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यासह आशिष शेलारसुद्धा उपस्थित….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असताना, आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. शिवसेनेच्या आमदार अपत्रातप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर आता याचा निर्णय विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असल्याने त्याची प्रतीक्षा आहे.
याबाबतीत मोठ्या घडामोडी चालू असतानाच, गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
मुंबई गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण आणि मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या लालबागचा राजा हा महत्त्वाचा गणपती मानला जातो. देशभरासह जगभरातून येथे भाविक दर्शनाला येत असतात.
दरम्यान, पुढील वर्षी येणाऱ्या लोकसभा, विधान सभा, महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शहांचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.