मनोज जरांगे पाटलांना भोवळ,बीड दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
जालना :- “मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कालच आपल्या पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. आता, मिशन मुंबई म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांच्या मराठवाड्यात सातत्याने बैठका होत आहेत. त्याच बैठकांसाठी दौरा करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत आज पुन्हा अचानक बिघडली. जालन्यातून बीड (Beed) दौऱ्यावर जात असताना भोवळ आल्याने मनोज जरांगे दौरा सोडून माघारी परतले आहेत. त्यानंतर, छ. संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सध्या उन्हाळाचा जोर असून मराठवाड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यातच, मनोज जरांगे पाटील हे आज बीड दौऱ्यावर असताना त्यांना भोवळ आली. जरांगे पाटील यांना उप्षाघात म्हणजे सनस्ट्रोक अतिसाराचा त्रास होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तसेच, पुढील काही दिवस विश्रांतीचा सल्ला देखील डॉ. विनोद चावरे यांनी दिला आहे.
29 ऑगस्टला मुंबईत धडक
मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पुढच्या आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली आहे. 29 ऑगस्टला मुंबई धडक देऊन आमरण उपोषणाला सुरुवात करणार असल्याचामनोज जरांगे-पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच नाही येत आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
बांठिया आयोगाचाही केला उल्लेख
मला वाटतं जनगणना करण्याची आवश्यकता सरकारला नसावी. कारण बाठिया आयोगाने आत्ताच रिपोर्ट दिला आहे, त्या शिफारशी जरी लागू केल्या तरी भागतं. जनगणना करण्याची आवश्यकता नाही. मात्र, सरकारची इच्छा आहे, तर केली तरी हरकत नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….