हा राजकीय मंच नाही, सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळा आयोजीत केला आहे. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नारायण राणे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता. कारण हा राजकीय मंच नाही. जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राचा सत्कार होता असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. त्यामुळं जे आले त्यांचा सत्कार आहे, जे नाही आले त्यांचा मनातून सत्कार आहे असे फडणवीस म्हणाले.
शक्ती आणि भक्तीचा इतिहास इथं पाहायला मिळत आहे
गौरवशाली महाराष्ट्र हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केला आहे. इथं जी दालनं तयार केली आहेत ती अतिशय सुंदर आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येकाने बघावी अशी ही दालन आहेत. शक्ती आणि भक्तीचा इतिहास इथं पाहायला मिळत आहे. राज्यातील थोर पुरुष संयुक्त महाराष्ट्र लढा, विविध पुरस्कार प्राप्त रत्न असा सगळा राज्याचा इतिहास इथ मांडला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला आधी माहिती असतं की इथ खाद्यचे स्टॉल आहेत तर एक तास आधी मी आलो असतो. मी म्हणत असतो मी पुन्हा येईल. तर मी परत आलो असतो असेही फडणवीस म्हणाले.
प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या जडणघडणीत हात
मुंबई महाराष्ट्राला सहज मिळेल असे वाटत नव्हतं 106 हुतात्म्यांनामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यावेळी विदर्भातील नेत्यांनी एकमुखी निर्णय घेतला. आपली मराठी टिकवायची असेल तर आपण एक व्हायला हवं आणि त्यानुसार सगळेजण एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला असे फडणवीस म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला, हे स्वागतर्रह आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या जडणघडणीत हात आहे. त्यामुळं त्यांचा सन्मान होणं अतिशय चांगलं आहे. मी तीन वेळा मुख्यमंत्री झालो. एकदा 72 तास मुख्यमंत्री झालो त्यावेळी अजित पवार देखील 72 तास उपमुख्यमंत्री झाले. आमच्या दोघांच्या नावावर सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होण्याच रेकॉर्ड असल्याचे फडणवीस म्हणाले.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”