महागाव येथे सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन ; महागाव तालुका पत्रकार संघाच्यावतीने विविध मान्यवरांचा पुरस्काराने केला जाणार सन्मान….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
निलेश नरवाडे (पॉलिटिक्स स्पेशल :- महागाव तालुका प्रतिनिधी)
महागाव :- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक किर्तनाच्या कार्यक्रमाचे तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने दि.४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने राष्ट्रीय किर्तनकार,सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ४ मे २०२५ रोज रविवारला सायंकाळी कै.सटवाराव नाईक सभागृह पंचायत समिती महागाव येथे आयोजित करण्यात आले असुन या कार्यक्रमामध्ये समाजातील घटकांसाठी विशेष कार्य करून समाजहित साधणाऱ्या मान्यवर मंडळींना विविध पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये सामाजिक कार्य पुरस्कार श्री एकवीरा देवी संस्थान हिवरा(संगम), कृषिभुषण पुरस्कार विनोद मैंद उटी,अमृतराव देशमुख अंबोडा,तालुका भुषण पुरस्कार श्रीमती किर्तीताई राजेश चिंतामणी कारागृह अधिक्षक जि.अमरावती,समाज भुषण पुरस्कार गुरूवर्य ह.भ.प.तानाजी बापु निज धाम आश्रम मुडाणा ता.महागाव यांचा सन्मान करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम ज्येष्ठ नेते,महागाव तालुका जिनींग प्रेसिंगचे अध्यक्ष तथा नगरसेवक संभाजीराव नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व आ.किसनराव वानखेडे,नगराध्यक्षा सौ.सुनंदाताई दिलीपराव कोपरकर,नितीन भुतडा (जिल्हा समन्वयक भाजपा),माजी आमदार राजेंद्र नजरधने, काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे,प्रमोद भरवाडे (उपनगराध्यक्ष न.पं.महागाव,शिवसेना उपजिल्हा प्रमुख),रामराव पाटील नरवाडे(शिवसेना नेते,नगरसेवक), साहेबराव पाटील कदम(माजी जि.प.सदस्य),शिवाजीराव राठोड(माजी जि.प.सदस्य),शिवाजीराव देशमुख (माजी जि.प.सदस्य)हनुमंत गायकवाड(उपविभागीय पोलिस अधिकारी उमरखेड),अभय मस्के(तहसीलदार महागाव),धनराज निळे (ठाणेदार पो स्टे.महागाव),ज्ञानेश्वर टाकरस(गटविकास अधिकारी पं.स.महागाव),देवेंद्र मुनेश्र्वर (वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव),समाधान धुळधुळे (तालुका कृषी अधिकारी), प्रविण ठाकरे पाटील(रा.काँ.तालुकाध्यक्ष),महेंद्र कावळे(जिल्हाध्यक्ष काँगेस अ.जा.सेल), प्रा.शरदचंद्र डोंगरे यांच्यासह विविध मान्यवर मंडळींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.