सहकारी संस्थाची निवडणूक होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत
16 सप्टेंबर पर्यंत पुन्हा मुदत वाढ
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मधील कलम ७३ अअअ (३) मध्ये सुधारणा करणारा अध्यादेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रस्तुत केला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे. तसेच जादा कार्यकाळात केलेले कामकाजही वैध ठरणार आहे.
राज्यात गेल्या वर्षी डिसेंबरअखेपर्यंत एकूण ४७ हजार २७५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणे आवश्यक होते. राज्य सरकारने जानेवारी महिन्यात कर्जमाफी योजनेसाठी प्रथम तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. करोना प्रादुर्भावामुळे दुसऱ्या टप्प्यात १७ मार्चला पुन्हा निवडणुका तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ही मुदत १६ जून २०२० रोजी संपली आहे. त्यासही मुदतवाढ देण्यात आल्यामुळे निवडणुका घेणे आवश्यक असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १६ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी काढलेला अध्यादेश विधी विभागाने १० जुलै रोजी तो प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्याची मागणीही बाजूला पडली आहे. या अध्यादेशानुसार सहा महिन्यांच्या आत, म्हणजे १० जानेवारी २०२१ च्या आत निवडणुका घेता येऊ शकणार आहेत.

सत्तेसाठी हापापल्या “उमा”ने पक्ष टांगला वेशीवर ; ताई ऐवजी केली भाऊशी हात मिळवली…
शिस्तीच्या पक्षांमध्ये गौतमीचा शिरकाव; विधानसभा लोकप्रतिनिधीची लोकशाही भाऊंच्या दावणीला
विनोद तावडे प्रकरणामुळे महायुतीला बसणार फटका..? काय म्हणाले अजित पवार….
प्रणिती शिंदेंविरोधात ठाकरे गट खवळला ; “आमच्या पाठीत खंजीर खुपसला, यापुढे…”
‘त्या’ दिवशी आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार ; संजय राऊतांचं मोठं विधान….
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंड….
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….