पहिल्याच निवडणुकीतून “इंडिया” ची माघार ; तडजोड करण्यात भाजपाला यश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करूनही इंडिया आघाडीला सत्ता मिळवण्यात अपयश आले. मात्र, सरकारला विविध मुद्यांवर संसदेत आणि संसदेबाहेर सळो की पळो करण्याचा नारा विरोधकांनी यापुर्वीच दिला आहे.
पण पहिल्याच परीक्षेत विरोधकांनी माघार घेतली आहे.
लोकसभा अध्यक्षपदासाठी 26 जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीए सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याला यशही आल्याचे समजते.
केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि किरण रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवार देऊ नये, अशी विनंती त्यांनी केल्याचे समजते.
विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे मान्य केले आहे. मात्र, लोकसभेचे उपाध्यक्षपद परंपरेप्रमाणे विरोधकांना देण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकारचीही त्याला संमती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होईल, अशी दाट शक्यता आहे.
ओम बिर्ला यांच्या नावाची चर्चा
‘एनडीए’तील घटक पक्ष असलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या ‘टीडीपी’नं लोकसभा अध्यक्षपदाची मागणी केली होती. पण, भाजपकडून पुन्हा ओम बिर्ला यांच्यावरच विश्वास दाखवण्यात येणार असल्याचे समजते. हे पद अत्यंत महत्वाचे असल्याने भाजप ते आपल्याकडेच ठेवणार आहे.
ओम बिर्ला हे 18 व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिर्ला यांच्या मागील कार्यकाळावर आणि कामावर खूष आहेत. विरोधकांकडूनही त्यांच्या नावावर सहमती बनू शकते. त्यामुळे पुन्हा बिर्ला यांचे नाव पुढे आले आहे.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….