पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार ; अध्यक्षपदांची निवड बिनविरोध होणार नाही ; ओम बिर्ला यांच्यासमोर के सुरेश मैदानात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही. काँग्रेसकडून के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजप खासदार ओम बिर्ला यांनी 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला.
एनडीएने ओम बिर्ला यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने काँग्रेसचे खासदार के सुरेश यांना सभापतीपदासाठी उभे केले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.
लोकसभा स्पीकरच्या पदासाठी सत्ता पक्ष आणि विरोधकांमध्ये सहमति होऊ शकली नाही. आकडेवारी पाहता स्पीकर पदाच्या निवडणुकीत एनडीएचे स्थान मजबूत दिसते, पण INDIA आघाडीला वाटते की त्यांच्याकडे आपली ताकद दाखविण्याची संधी आहे. म्हणूनच, त्यांनी उपसभापती पद देण्याची अट न पाळल्यामुळे उमेदवार उतारला आहे. भारतीय लोकशाहीच्या ७२ वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडणार आहे की स्पीकर पदासाठी निवडणूक होणार आहे.
या परिस्थितीसाठी राहुल गांधी यांनी सरकारला जबाबदार ठरवले आहे. राहुल गांधी म्हणाले, विरोधकांनी स्पष्टपणे सांगितलं आहे यावर राजनाथ सिंग यांचा मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन आला आणि त्यांनी म्हटलं की, तुम्ही आमच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. त्यावर संपूर्ण विरोधीपक्षांचं म्हणणं आहे की, आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विधानसभा अध्यक्षाला पाठिंबा देऊ. पण आमची मागणी ही आहे की, लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना मिळायला हवं.
राजनाथ सिंग यांनी काल रात्री म्हटलं होतं की, याबाबत मी पुन्हा फोन करतो असं त्यांनी खर्गेंना सांगितलं. पण अद्याप त्यांचा कॉल आलेला नाही. त्यामुळं मोदी जर म्हणत असतील की विरोधकांचं कन्स्ट्रक्टिव्ह सहकार्य हवं आहे आणि आता आमच्या नेत्यांचा अपमान केला जात आहे. त्यामुळं यांची नियत साफ नसल्याचं स्पष्ट होतं आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….