नांदेड मध्ये भाजपाला मोठा धक्का ; सूर्यकांता पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- नांदेडमध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना सोबत घेऊन भाजपनं लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी खेळी केली असली तरी आता तिच खेळी भाजपवर उलटली आहे. कारण भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
गेल्याकाही दिवसांपासून सूर्यकांता पाटील या भाजपत नाराज होत्या. त्यामुळं त्यांनी काल भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागचं कारण सांगताना त्यांनी म्हटलं की, मी गेल्या दहा वर्षात खूप काही शिकले, त्यासाठी मी पक्षाची आभारी आहे. सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडं उमेदवारी मागितली होती. तिकीट न मिळाल्यानं त्यांनी सोशल मीडियातून जाहीर नाराजी व्यक्ते केली होती. त्यानंतर अखेर काल भाजपचा राजीनामा देत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सूर्यकांता पाटील या चार वेळा खासदार राहिल्या आहेत. तसंच एकदा त्या आमदारही राहिल्या आहेत. त्यांनी हिंगोली-नांदेडचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्रामीण विकास मंत्रालयात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. त्यानंतर संसदीय कार्य मंत्रालयात राज्यमंत्रीपद देखील सांभाळलं आहे. राजकीय करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ८ वर्षे नांदेड महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे.
१९९१ मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभा जिंकली होती. तर १९९९ मध्ये त्या राष्ट्रवादीत दाखल झाल्या होत्या. २०१४ मध्ये हिंगोलीतून काँग्रेसनं राजीव सातव यांना तिकीट दिल्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….