भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनातील दुर्मिळ क्षणचित्राचा प्रवास….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रहेमान चव्हान : ९६५७१७६१४८
पुसद :- महामानव तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस आहे , पाहू या त्यांचा जीवनातील काही छायाचित्र….
महामानव तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनसमुदयावर विशेष प्रभाव आहे. भारतीय इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या संघर्ष आणि प्रयत्नामुळे आज प्रत्येक भारतीय संविधनाच्या सहाय्याने आपल्या जीवनाला आकार देत आहे. संविधान हे त्यांच्याकडून मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. अशा या महान नेत्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन… या दिवसांच्या औचात्याने आम्ही वाचकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एैतिहासिक, दुर्मिळ आणि अनमोल अशा क्षणचित्रांचा प्रवास आपणा करिता…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूरजवळ महू या छोट्याशा खेड्यात झाला. कबीर पंथाचे अनुयायी असणारे रामजी आंबेडकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९०८ मध्ये मॅट्रीक परीक्षा पास झाले. त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. रमाबाई यांनी बाबासाहेबांना संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१२ साली एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए. झाले. यानंतर न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.पूर्ण केले. शिवाय नॅशनल डिव्हिडंट : ए हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनालिटिकल स्टडी या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९१६ साली लंडन स्कूल ऑफ इकॉनाॅमिक्समध्ये प्रवेश घेतला. तेथून त्यांनी एमएस्सी पदवी संपादन केली. पुढे ग्रेज इनमध्ये बार-ॲट-लॉसाठी प्रवेश घेतला. बॅरिस्टर इन लॉही पदवी घेतली. डीएससी आणि एलएलडी अशा पदव्यांसह त्यांनी ३२ हून अधिक पदव्या संपादन केल्या होत्या
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील अंबावडे हे त्यांच्या पूर्वजांचे गाव. त्यांच्या पूर्वजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये नोकरी केली. वडील रामजी यांनी देखिल सैन्यात नोकरी केली व सुभेदार पदावर असताना त्यांनी निवृत्ती स्विकारली. रामजींचे कुंटुब काही काळ रत्नागिरी त्यांनतर सातारा व १९०४ साली मुंबईमध्ये राहण्यास आले. १८९६ साली बाबासाहेब ६ वर्षाचे असताना त्यांच्या आई भीमाई यांचे निधन झाले.
रमाबाई यांनी बाबासाहेबांना पत्नी अर्धांगिनी म्हणून खूप मोठा आधार दिला होता.
स्वतंत्र भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही स्वप्न होते. पण, जातिग्रस्त आणि सनातनी देशाला कधीही स्वतंत्र म्हणता येणार नाही. म्हणूनच त्यांच्या कार्यपटलामध्ये केवळ सामाजिक सुधारणाच नव्हे तर समानता आणि स्वातंत्र्य यावर आधारित भारतीय समाजव्यकस्थेचाही समावेश होता.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला शिक्षणांच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. अनेक बहुजनांसाठी ज्ञानाची कवाडे खूली करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. तसेच संत गाडगेबाबा यांनी आपल्या प्रवचनातून बहुजन समाजाला धर्म, जात, रुढीपरंपरा, अंध्दश्रद्धा यातून जागे होण्याची चेतना दिली. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ तळागाळातल्या रंजलेल्या, गांजलेल्या अस्पृश्य, बहुजन समाजास जागे करण्याची होती. या तिघांनी एकमेकांना साथ देत एकमेकांना बळ दिले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सप्टेंबर १९२७ मध्ये समाज समता संघ आणि डिसेंबर १९२७ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली. या संस्था सामजिक समतेसाठी कार्य करत होत्या
तामिळनाडूमध्ये ई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांना तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच समजले जाते. जाती अंताच्या लढाईसाठी त्यांनी मोठे काम केले. जे काम बाबासाहेबांनी भारतभर केले त्याच कामाला दक्षिणेत कार्य पेरियार यांनी केले.
१४ ऑक्टोंबर १९५४ रोजी महास्थवीर भिख्खू चंद्रमणी यांनी त्रिशरण आणि पंचशील ह्यांचा पाठ केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पत्नी डॉ. शारदा यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना विनम्र अभिवादन….