“तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावावं लागेल”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेली दीड वर्ष झालं आपल्या सर्वाचं आयुष्य एकाच शब्दाभोवती फिरत आहे ते म्हणजे कोरोना (Corona). कोरोनानं गेल्या दीड वर्षात अवघ्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
वेगवेगळ्या व्हेरियंटच्या (varient) माध्यमातून कोरोना सध्या चिंता निर्माण करत आहे. सध्या कोरोनाच्या ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हिरियंटनं आपल्याला पन्हा लाॅकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर उभं केलं आहे.
दक्षिण आफ्रिका (South Africa) येथून ओमिक्राॅनच्या व्हेरियंटचा प्रसार व्हायला सुरूवात झाली आहे. सध्या अवघ्या जगावर ओमिक्राॅनचा धोका निर्माण झाला आहे. सध्या आपल्या देशात ओमिक्राॅनचे एकुण चार रूग्ण आहेत. यातील 2 कर्नाटक, 1 गुजरात, 1 महाराष्ट्र अशी रूग्ण संख्या आहे. या नव्या व्हेरियंटबाबत अनेक तज्ज्ञ आपली संशोधक मतं व्यक्त करत आहेत.
लहान मुलांची प्रामुख्यानं जास्त काळजी घेण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जे रूग्ण आढळले आहेत त्यात जास्त प्रमाणात लहान मुलं आहेत, असं डाॅ. अविनाश भोंडवे (Avinash Bhondve) म्हणाले आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क वापरण्यात यावेत. वयोवृद्ध आणि लहान मुलांना या नव्या व्हेरियंटचा धोका अधिक आहे. परिणामी आपण काळजी घेतली नाही तर लाॅकडाऊन लावावं लागण्याची शक्यता आहे, असं डाॅ. भोंडवे म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या सर्वत्र ओमिक्राॅचा प्रसार हा डेल्टापेक्षा पाचपट जास्त वेगाने होत आहे. परिणामी सध्या सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!