वडसद तांडा येथील शाळेची ग्रँड ओपनिंग…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद (श्रीरामपूर) :-
कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून प्राथमिक शाळा बंद होत्या. परंतु महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शाळा सुरू करण्याचे आदेश मिळाले. व ग्रामीण भागातील वडसद तांडा येथे आज अनोख्या पद्धतीने चिमुकल्यांचे स्वागत करुन शाळेचे ग्रँड ओपनिंग करण्यात आले. यामुळे विद्यार्थी,शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळा शुभारंभाचे औचित्य साधून पुसद तालुक्यातील माणिकडोह केंद्रातील वडसद तांडा येथील जि.प.प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.जामगडे व सहाय्यक शिक्षक एस.ए.राठोड यांनी जि. प. शाळेची ग्रँड ओपनिंग करण्याचे ठरविले व भल्या पहाटेपासूनच कोरोना नियमांचे पालन करुन गावकर्यांच्या सहकार्यातून चिमुकल्यांना शाळेत आणण्यासाठी बैलांना पोळ्याप्रमाणे झुली टाकून डफडीच्या तालावर व विविध घोषणा देऊन प्रभातफेरी द्वारे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत फुगे व चाॅकलेट देऊन करत शाळेचे दैवत असलेल्या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत करुन ग्रँड ओपनिंग केले.यामुळे गावातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण होऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.
याप्रसंगी गावाच्या सरपंच सुषमा राठोड तसेच शाळा व्य.समितीचे अध्यक्ष मनोहर जाधव तसेच जेष्ठ नागरिक बळीराम जाधव, राजेश राठोड ,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड, अरविंद जाधव ,बाळू आडे, अनिल जाधव तसेच ज्यांनी बैलगाडी उपलब्ध करून दिली ते प्रदीप राठोड, सुभाष सोनटक्के यांचेसह कमल चव्हाण व तांड्यातील सर्व पालकांचे सहकार्य मिळाले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..