स्वतंत्र विदर्भावर सहमती नाही :- केंद्राची भूमिका…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- स्वतंत्र विदर्भावर साधारण सहमती झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडत केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाची मागणी धुडकावून लावली आहे.
भाजपचे खासदार अशोक नेते यांनी विचारलेल्या अतारांकित लेखी प्रश्नाला गृहमंत्रालयाने उत्तर दिले आहे.
स्वतंत्र विदर्भाबाबत केंद्र सरकारने काय पावले उचलली आहेत, असा नेते यांचा प्रश्न होता. त्यावर असा स्वतंत्र विदर्भाचा कुठलाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचे उत्तर मिळाले आहे.
प्रस्ताव विचाराधीन नसेल तर कारण काय, असा उपप्रश्नही विचारण्यात आला. त्यावर ही मागणी अनेकदा झाली आहे. मात्र साधारण सहमती दिसली तरच नव्या राज्याबाबत केंद्र सरकार पावले उचलते, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
विदर्भवाद्यांना धक्का
स्वतंत्र विदर्भाचे तुणतुणे वाजविणाऱया मंडळींना केंद्राच्या आजच्या कबुलीमुळे जबर धक्का बसला आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी तशी थंड पडलेली आहे. खासदार अशोक नेते यांनी यापूर्वी स्वतंत्र विदर्भाबाबत लोकसभेत खासगी विधेयकदेखील मांडले होते. मात्र कामकाजात प्रत्यक्षात समावेश करण्यात आला नव्हता.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….