“राज्य सरकार अधिवेशना पासून दूर पडत आहे”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यंदाचं अधिवेशन हे मुंबईत घेण्यात येणार असून अधिवेशन 5 दिवसांचं असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, यावरून भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
ते म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. यातील पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, यामुळे यंदाचं अधिवेशन केवळ 4 दिवसाचच असणार आहे. आमची मागणी होती, अधिवेशन वाढविण्यात यावे. मात्र, राज्य सरकारने अधिवेशन वाढविण्यास नकार दिल्याचं फडणवीस म्हणाले.
पुढे फडणवीस म्हणाले, तारांकीत प्रश्नावर गेल्या 2 वर्षात एकदाही उत्तर देण्यात आलं नाही, लक्षवेधीलाही उत्तर देण्यात आलं नाहीये. त्यामुळे सरकारने सगळी आयुधं गोठविण्याचं काम केलं आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. शिवाय माझ्या मागणीनंतर सरकारने तारांकीत प्रश्नाची उत्तर देण्यास सरकार तयार झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, यंदाचं अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. यावरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या 2 वर्षात विदर्भात एकही अधिवेशन झालं नाही. त्यामुळे विदर्भातील नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. आता येत्या मार्चमधील अधिवेशन नागपूरला घेण्यात यावं अशी आम्ही विनंती केली आहे,’ असंही ते म्हणाले आहेत.